मिशन शौर्य २ च्या एव्हरेस्टवीर चंद्रकला गावित ला हवीय नोकरी..

अनामित
पिंपळनेर वार्ताहर (सुशिल कुवर) मिशन शौर्य - २ - २०१९ अंतर्गत जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करून संपूर्ण विश्वात भारताचं नावलौकिक करून तिरंग्याची शान वाढवणारी एव्हरेस्टवीर चंद्रकला गावीत हिला शासकीय सेवेत नोकरीची संधी मिळावी म्हणून एव्हरेस्टवीर चंद्रकला गावित हिने जिल्हाधिकारी जलज शर्मा, साक्री विधानसभाचे आमदार सौ. मंजुळाताई गावित, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तुप्ती घोडमिशे यांच्याकडे निवेदनाद्वारे नोकरीची मांगणी केली.
[ads id='ads1]
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून २०१९ मिशन शौर्याच्या दुसऱ्या टप्प्यातील उपक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यांतून व अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील ११ आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वात अवघड समजले जाणारे आणि सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर केले. या यशाचा झेंडा रोवत राज्यासह देशाचा नावलौकिक विश्वात उंचावला. या आदिवासी विध्यार्थीच्या विक्रमी कामगिरीबद्दल सम्मानचिन्ह प्रदान झाले. 

तसेच शासनाने नोकरी देण्याचेही आश्वासन दिले होते. या धाडसी उपक्रमात ज्या प्रमाणे तिरंग्याची शान वाढविण्यासाठी प्राणाची आहुतीही द्यायला तयार झाली, तसेच मी आता समाजासाठी काही चांगले करण्यासाठी, स्वतः च्या पायावर सन्मानाने उभे राहण्यासाठी सरकारी नोकरी आवश्यकता आहे, असे सांगत शासनाने दिलेल्या वचनानुसार मला शासकीय सेवेत नोकरी देऊन सामावून घेतले जावे, अशी मागणी चंद्रकला गावित हिने केली आहे.निवेदन देताना चंद्रकला गावीत हिच्यासह महारू चौरे, शंकर चौरे, गुलाब गावीत, अरूण ठाकरे, सुमित चौरे उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!