रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) Raver शहरातील माऊली रुग्णालयात एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला. डॉक्टरांच्या मदतीने महिलेची नॉर्मल प्रसुती झाली असून आईचीसह तीन मुलांंची तब्येत चांगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार Raver शहरातील मन्यारवाडा भागातील रहिवासी अमरीन बी शेख मुस्तकीन (वय २२) या महिलेस त्रास जाणवू लागल्याने त्यांना रावेर येथील माऊली हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. संबंधीत महिलेची प्रकृती पाहता नॉर्मल प्रसूती होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. डॉ. संदीप पाटील यांनी संबंधीत रूग्णाच्या नातेवाईकांना धीर देत अमरीनची नॉर्मल प्रसूती केली. दुपारी ठीक १.२२ वाजेच्या सुमारास तिळ्यांना अमरीनने जन्म दिला. तिघ ही मुले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. [ads id="ads2"]
तिळ्यांना जन्म दिल्याचे माहित हाेताच रूग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना पाहण्यासाठी रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती. माऊली हॉस्पीटलचे डॉ. संदीप पाटील व कर्मचाऱ्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.



