यावल वार्ताहर (सुरेश पाटील) राज्यासह संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या भारतीय जीवन विमा निगम तथा एलआयसी या सर्वात मोठ्या विमा कंपनीला आज तब्बल 65 वर्ष पूर्ण झाले यामुळे विमा संबंधित कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी आणि एजंट ग्राहक यांनी एलआयसी चा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात पार पाडण्याचे नियोजन करायचे होते परंतु संपूर्ण नाशिक विभागात एलआयसीची ऑनलाईन सेवा खंडित होऊन अचानक बंद पडल्याने एलआयसीचा संपूर्ण आर्थिक व्यवहार कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे
[ads id='ads1]
नाशिक विभागातील संपूर्ण एलआयसी अधिकारी,कर्मचारी,एजंट ग्राहकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे राज्य शासन आणि केंद्र शासनाने तात्काळ लक्ष केंद्रित करून सर्व स्तरातील यंत्रणेचा विमा काढण्याचे काम जी एक कंपनी करीत आहे त्याकडे तातडीने लक्ष केंद्रीत करून एलआयसीची ऑनलाईन सेवा अखंडित कशी सुरू राहील याबाबत तात्काळ कार्यवाही करावी असे सर्वस्तरातून बोलले जात आहे. तसेच आज वाढदिवस असताना एलआयसीची ऑनलाईन सेवा बंद कोणी व का कशासाठी बंद पाडलीअसेल का? हा विषय समाजाला राजकारणाला आत्मचिंतन करण्यालायक आहे असे संपूर्ण स्तरातून बोलले जात आहे.
