सावदा येथून जवळच असलेल्या कोचुर खुर्द गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील विजेचा खांबावरील तार तुटून पाच बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी बकऱ्यांना चारण्यासाठी नेत असतांना हा अपघात घडला असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.[ads id="ads1"]
रावेर तालुक्यातील कोचुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात विजेचा खांबावरील तार अचानक तुटून पडल्याने शेतात चरण्यासाठी जात असलेल्या ५ बकऱ्यांवर पडली. यांत गौतम तायडे यांच्या मालकीच्या असलेेेेेेेल्या तीस किमतीच्या तीन, युवराज तायडे यांच्या मालकीची सात हजार किमतीची १तर संतोष तायडे यांच्या मालकीची सात हजार किमतीची एक अशी अदांजे ४४ हजार रुपयाच्या बकरी धन मृत्यू पडल्याने सकाळी एकच गोंधळ उडाला. [ads id="ads2"]
महावितरणच्या गलथान कारभारानेच आमचे नुकसान झाल्याचा आरोप करत संबधितांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. महावितरणच्या कारभार विरोधात वातावरण तापल्याने सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि देविदास इंगोले यांनी आपल्या पथकासह लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबधितांची समजूत घालून वातवरण शांत केले.