मात्र त्यानंतर कोरोनामुळे हा भरतीचा निकाल लागण्यास उशीर झाला होता. तसंच मराठा आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर असल्यामुळे हा निकाल लागण्यास उशीर झाला होता. अनेक जणांना पद मिळूनही त्याच्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या. हा मुद्दा न्यूज 18नं सतत लावून धरला होता.
मात्र आता अखेर हा निकाल लावण्यात आला आहे. MPSC ना या निकालात निवड झालेल्या एकूण 420 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून निकालाची वाट बघणाऱ्या उमेदवारांना आता MPSC नं दिलासा दिला आहे. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा निकाल लावण्यात आला आहे.[ads id="ads2"]
यामध्ये खुल्या प्रवर्गातून प्रसाद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मागास वर्गातून रोहन कुंवर यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तसंच महिला प्रवर्गातून मानसी पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/j9zwBb78bI
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 28, 2021