लहान मुलासमोर महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस उपअधिक्षकाला अटक..

अनामित
उदयपुर - पोलिस उपअधिक्षक (DSP) आणि महिला कॉन्स्टेबल एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये अश्लील चाळे करत असल्याचा एक Video Social Media वर प्रचंड व्हायरल झाला होता. या Video आतील रिसॉर्टची माहिती घेत पोलिसांनी संबंधित रिसॉर्टवर छापा टाकून थेट पोलिस उपअधिक्षक (DSP) ला अटक करण्याची कारवाई केली आहे. 
[ads id='ads1]
महिला कॉन्स्टेबलसोबत लहान मुलगा देखील होता. त्यामुळे संबंधित महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आलेली नाही. अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात लीक झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. गुरुवारी रात्री उशिरा रिसॉर्टवर छापा टाकून उदयपूर येथून पोलिस उपअधिक्षक हीरालाल यांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिस उपअधिक्षक DSP महिला कॉन्स्टेबलसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलचा पती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला होता. पण डीएसपीच्या दबावामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला गेल्याचा आरोप पतीनं केला आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही निलंबीत करण्यात आलं आहे. तर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या डीसीपींवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  [ads id="ads2"]

स्पेशल ऑपरेशन ग्रूपचे एडीजी अशोक राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जात असून व्हिडिओ शूट कुणी केला आणि कुणी व्हायरल केला याचाही शोध घेतला जात आहे. व्हिडिओमध्ये लहान मुल देखील दिसत असल्यानं राज्य बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा संगीता बेनिवाल यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नागौर पोलीस अधिक्षकांना या प्रकरणाचा तीन दिवसांत अहवाल देण्याचा आदेश संगीता बेनिवाल यांनी दिला आहे. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!