पोळा हा सण श्रावन महीण्याच्या अमावस्येला येतो. हा सण खानदेश आणि निमाड या भागात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवसाला खानमयली, दुसर्या दिवशी पोळा, आणि तिसर्या दिवशी करकर असे तिन दिवस साजरा करतात. या तिनही दिवशी बैलाकडुन कुढल्याही प्रकारचे काम करवुन घेतले जात नाही. चारा पण डोक्यावर आणतात.
[ads id='ads1]
पोळ्याच्या दिवशी बैलाला चांगल्या प्रकारे सजवितात. सकाळी आंघोळ घालतात व शिंगाला रंगाने नक्षी काढतात.तसेच मासोंडी, गेठ्या, नाथ, गळ्यातील झिला, गळ्यात तोळे, घंटी, घोगर, आकर्षित करणारे बैलदागिने अंगावरील झुला,दोर अशाप्रकारे बैलांना सजविले जाते. बैलांसाठी पक्वान्न बनविले जातात.
पुरणपोळी ,सिरा पात्या, गुलगुलं, वळभजं, पापड, कुळ्ळुया, रस्सी, खिर अशाप्रकारे पक्वान्न बनवुन पहीला मान म्हणुन बैलाला ओवाळण्यात "जेवळण्यात" येते व नंतर घरातील मंडळी जेवतात. लहान मुलांना मातीचे बैल बनवुन देतात किंवा बाजारातुन बनवलेले आणतात.
पाटावर ठेवुन त्यालाही 'जेवळतात'. काही लोकांच्या घरी जुने मातीचे बैल असतात व ते तसेच ठेवुन देतात.व पुढच्या वर्षी काढतात. पोळ्याच्या दिवशी घरोघर बैल नेण्याची प्रथा आहे. व त्या घरातुन नारळ किंवा काही रुपये मानपान म्हणुन दिले जातात.या दिवशी बैलांना हनुमान किंवा गाववेशीवर असणारे, देउळांवर नेण्याची प्रथा आहे.
पोळ्याच्या दिवशी गावागावात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. कबड्डी स्पर्धा तसेच बैलांची शर्यत अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पोळा हा सण खासकरुन खान्देशातील शेतकरी(किरसान) या लोकांचा सण आहे. या सणाचा इतिहास पंधराव्या शतकापासुनचा आहे.