रावेर - तालुक्यापासुन 25 किलोमीटर अंतर असलेल्या पर्यटन स्थळ म्हणुन ओळखले जाणारे पाल येथे एका मध्यप्रदेशात राहणाऱ्या वय 20 वर्षीय तरूणीला रावेर तालुक्यातील पाल येथील तरुण गुलाम रसुल नवाज तडवी (वय-25) याने लग्नाचे आमिष दाखवत पाल येेथ त्याच्या घरी घेवून गेला त्यानंतर आरोपीने अत्याचार केल्याची धक्कादायक घडना घडली आहे.
[ads id='ads1]
याप्रकरणी पिडीत तरूणीने मध्यप्रदेशातील छीपाबड पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात तक्रार दिली. तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा हा रावेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
अत्याचार करुण तरुणीला जिवे मारण्याची धमकी!
गुलाम रसुल नवाज तडवी (वय-25 रा,पाल ता रावेर जि जळगाव) अशी अत्याचार करणाऱ्या आरोपीची ओळख आरोपी हा नाशिक येथे मजूरीसाठी गेला असता नाशिक येथुन त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर एकमेकांशी मोबाईलवर संपर्क नंतर मैत्री झाली होती. तीन महिन्यापुर्वी गुलाम तडवी याने पिडीत मुलीला 02 जून 2021 रोजी भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार मुलगी रावेर येथे भेटण्यासाठी आली.
गुलाम तडवी याने मुलीला दुचाकीवर बसवून पाल येथील त्याच्या घरी घेवून गेला. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार घटला. तर ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुन्हा दिनांक 9 सप्टेंबर रोजी देखील पिडीत तरूणीवर अत्याचार केला.
याप्रकरणी पिडीत तरूणीने मध्यप्रदेशातील छीपाबड पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात तक्रार दिली. तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा हा रावेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. अद्याप संशयित आरोपीला अटक केलेली नाही. पुढील तपास DYSP विवेक लावंड करीत आहे.

