रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) रावेर- राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी रावेर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक, तथा रावेर विकास युवाशक्ति फाउंडेशन अध्यक्ष अॅड. सुरज प्रकाश चौधरी यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली
[ads id='ads1]
अॅड सुरज चौधरी यांची राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे महासचिव सचिन राजुस्कर, समन्वयक डॉ.अशोक जिवतोडे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चेतन नागोरावजी शिंदे यांच्यासह मित्रपरिवार व सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.