विशेष लेख : आदिवासी संस्कृती आणि धर्म - राजेंद्र पाडवी

अनामित

(विशेष लेख) 

आदिवासी हा या देशाचा मूळ निवासी आहे. आदिवासी- आदि म्हणजे पूर्वीपासून,वासी- वास्तव्य करणारा. सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून निर्मिती तोच म्हणजे आदिवासी. आदिवासी ही या देशाची मूळ संस्कृती आहे. धर्म म्हणजे एक जीवनपद्धती, जीवनशैली आहे. 

[ads id='ads1]

आदिवासी संस्कृती, जीवनपद्धती,भाषा,रूढी-परंपरा ही इतर धर्मापेक्षा भिन्न आहे.आदिवासी हा निसर्गपूजक आहे.आदिवासी आणि निसर्गाची घट्ट नाते आहे.सर्व देव निसर्गाशी संबंधित आहे.याहा मोगी माता,वाघदेव,पांढरमाता ,डोंगऱ्या देव, कंसरामाता, निलीचारी, गवाणपूजन,  खोलोपूजन, गिमदेव या आदिवासींचे देव आहे. यामुळे इतर कोणत्याही धर्माची आदिवासीं संस्कृतीचे काडीमात्र संबंध नाही.



आदिवासीं संस्कृती हजारों वर्षापासून आजही टिकून आहे. स्वतःची अक्षर लिपी नाही,तरी मौखिक परंपरेने टिकून आहे. आदिवासींच्या जन्म-मृत्यूचा विधी ,लग्नाचा पूजाविधी,सण,परंपरा आचार-विचार व एकूणच आदिवासींची जीवन संस्कृती ही वेगळी आहे.परंतु,गेल्या काही वर्षापासून आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन [ads id='ads2] 

वेगवेगळ्या धर्मात धर्मांतर केले गेले आहे.आदिवासींच्या शाळा सोडल्याचा दाखल्यावर धर्माचा उल्लेख केला जातो.दाखल्यावर धर्माचा उल्लेख करू नये यासाठी आदिवासी संघटना वारंवार मागणी करत आहे.मात्र,दखल घेतली जात नाही.दाखल्यावर धर्माचा उल्लेख टाळावा यासाठी आदिवासी विभाग सामान्य प्रशासनाने सन २००० ला परिपत्रक काढले.परंतू,स्वार्थी राजकीय लोकांनी दबाव आणून परिपत्रक काही दिवसांतच रद्द करायला लावले.आदिवासींची दिशाभूल केली जात आहे.आदिवासींना मुद्दाम वनवासी,गिरीजन,जंगली,रानटी अशी विकृती नावे देऊन इतिहास लिहिला गेला.मानवी मूल्यांनी भरलेली आदिवासी संस्कृती,आदिवासी क्रांतिकारकांच्या पराक्रमी इतिहास प्रस्थापित इतिहासकार व संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्याना दिसला नाही.



       १९५० पूर्वीच्या इंग्रजांनी केलेल्या जनगणना पहा. आदिवासी कोणत्याही धर्मात नव्हता.
१) १८७१ - Aborigine (मूळचा, आदिवासी)
२) १८८१- Aboriginal ( मूळचा,आदिवासी)
३) १८९१- Aboriginal
४) १९०१- Animist( तत्वांचा पुरस्कर्ता,जीववादी)
५) १९११- Animist 
६) १९२१ - Animist
७) १९३१- Tribal Religion (आदिवासी धर्म )
८) १९४१- Tribes (आदिवासी)
९) १९५१- Shedule Tribe आदिवासी,अनुसूचित जमाती)
            १८७१ ते १९४१ पर्यतचा जनगणनेत आदिवासीचा स्वतंत्र धर्म आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने आदिवासी हा कोणत्याही धर्माचा नाही ,तो मूलनिवासी आहे म्हणून जजमेंट दिले आहे.आदिवासी बाबत केंद्र सरकारचा नकारात्मक दृष्टिकोन असला तरी ढेबर कमिशन,आंतरराष्ट्रीय श्रमिक संघ,जागतिक बँक अनुसूचित जमातीचा आदिवासी लोक असाचा अर्थ होतो,अशी मान्यता दिली आहे. भारतातील आदिवासींचे स्वतंत्र अस्तित्व न मागण्यामागे जागतिक आदिवासी हक्कांचा जाहीरनामा मान्य करावा लागू नये


 हा उद्देश स्पष्ट दिसतो.जगातील आदिवासीपैकी २३ टक्के आदिवासी भारतात आहेत.सुरूवातीस भारतातील ६ कोटी आदिवासींची नोंद संयुक्त राष्ट्र संघात आहे.पूर्वी आदिवासींसाठी स्वतंत्र धर्मकोड होता.तसा,केंद्र सरकारने आदिवासीसाठी स्वतंत्र धर्मकोड जाहीर करावा.आदिवासी आमदार, खासदार ,मंत्री,  नेत्यांनीही आपापल्या पक्षांचे गुलाम न होता,दुसऱ्यांचा मेंदूचा वापर न करता, स्वतःचा मेंदूचा वापर करून स्वतंत्र धर्मकोडची मागणी करावी.आदिवासी नेत्यांनी फक्त पक्षांचे काम न करता आदिवासी समाजाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.आदिवासी संघटना, बुद्धीजीवी वर्ग, समाजसेवक ,सर्वच आदिवासी बांधवांनी आदिवासींच्या अस्तित्वासाठी एकत्रित येऊन लढा उभा केला पाहिजे.आदिवासी धर्माकोडला विरोध का? आदिवासीवर अन्याय,अत्याचार कोण करते? आदिवासींची मानवी मूल्यांनी भरलेली संस्कृतीवर हल्ला करून, इतर संस्कृती का लादली जाते? जागतिक आदिवासी दिनाला विरोध का? आदिवासी विरुद्ध आदिवासीत भांडण का लावली जातात? या गंभीर प्रश्नांवर चिंतन करून,उत्तरे शोधून आदिवासींच्या अस्तित्वासाठी एक होऊन उलगुलान केले पाहिजे.
          
राजेंद्र पाडवी, राज्यमहासचिव बिरसा फायटर्स मो.९६७३६६१०६०

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!