[ads id='ads1]
संपादकीय लेख
श्यामपूर नावाचं शहर. त्या शहरात एक लहानशी शाळा होती. ज्या शाळेचं नाव रामभाऊ प्राथमिक शाळा होतं. त्या शाळेतील शिक्षक कर्मचारी हे सुखी नव्हते. ते गुलाम असल्यागत मुख्याध्यापकाच्या मनाने चालत होते. मुख्याध्यापक महोदय हे स्वतःला शहंशाह समजत होते. त्यात कारणही होतं.
त्या शाळेला एक मालकही होता. ज्याला संचालक म्हणत असत. त्याचा उद्देश फक्त पैसा कमविणे होते. त्यासाठी तो कोणत्याही स्तराला जावू शकत होता नव्हे तर आपल्या शाळेतील शिक्षकांवर आरोप लावू शकत होता. ते आरोप लावून त्यानं कितीतरी कर्मचारी नोकरीवरुन काढून टाकले होते.
मुख्याध्यापक हा संचालकाचा नातेवाईक होता. तो संचालक महोदयाच्या मतानं चालत होता. वागत होता. तो संचालक महोदयाच्या म्हणण्यानुसार शाळेतील शिक्षकांकडून पैसा उकळत होता. आपल्या शाळेतील शिक्षकांना वेठीस धरत होता. गुलामागत वागवत होता.
मयूर हाही त्याच शाळेत शिक्षक होता. त्याला वाटत होतं की मुख्याध्यापक विनाकारण त्यांना त्रास देतोय. त्याला माहित नव्हतं की यात संचालक महोदयाचा सिंहाचा वाटा आहे. तसं त्याला पत्र येताच तो त्यांनाही त्रास देत होता. त्या मुख्याध्यापकाची मानसिकता खराब करीत होता.
दिवसामागून दिवस जात राहिले. काळ सरकता झाला व निसर्गाच्या विधीनुसार मुख्याध्यापक मरण पावला व त्या ठिकाणी त्या शहरातील बड्या अधिका-यानं त्याची नियुक्ती संचालकाचं न ऐकता मुख्याध्यापकपदी केली व तो मुख्याध्यापक बनला.
मयूर मुख्याध्यापक बनला खरा. परंतू त्यानं मनाशी ठाणलं होतं. आपण कोणाला त्रास द्यायचा नाही. कोणाला अपशब्द बोलायचे नाही. तो शांत होता. संयमी होता. परंतू त्याला त्या शाळेतील काही शिक्षक जळत होते. जे संचालक महोदयाचे जवळचे नातेवाईक होते.
मयूरचं चांगलं वागणंही त्यांना खपत नव्हतं. संचालक त्याला सहकार्य करीत नव्हता. तसे ते नातेवाईकही त्याला त्रास देत होते. त्याच्यावर वेगवेगळे आरोप लावून वेगवेगळ्या आरोपाचे पत्र पाठवीत होते. कारण त्यांना संचालक महोदयांनी पदाची लालसा दाखवली होती. त्याच माध्यमातून आता त्याला त्या पदावरुन दूर करण्याचे प्रयत्न सुरु होते.
मयूरला आता पुर्वीचा काळ आठवत होता. ज्या काळात त्याचा मुख्याध्यापक त्यांना त्रास देत होता. आता त्याला कळलं होतं की तो मुख्याध्यापक त्याला का बरं त्रास देत असेल.
मयूरला आता पदाचं महत्व समजलं होतं. त्याला त्रास होत होता. त्यातच त्यानं परीस्थीतीनुसार आपला स्वभाव बदलवला होता. परंतू आता त्याला कळलं होतं की जे सरळ आहेत. आदेश ऐकतात. त्यांचं ठीक. परंतू जे ऐकत नाही त्यांना वठणीवर आणणे.
आज मयूरही दिवंगत मुख्याध्यापकासारखा शहंशाहच बनला होता. संचालक त्याला वेळोवेळी घाबरत होता नव्हे तर त्याचे सहाय्यक सहकारीही त्याला घाबरत होते. जणू परिस्थीतीनंच त्याला ते सगळं शिकवलं होतं आणि हेही शिकवलं होतं की सरळ बोटानं तूप निघत नाही. त्यासाठी करंगळी वाकडी करावी लागते. तसेच आता सरळ वागण्याचा काळ नाही. परिस्थीतीनुसार बदलावंच लागतं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

