राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांचे प्रांतधिकारी यांना निवेदन

अनामित

भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसींची जनगणना करण्यात आलेली नाही. देशाच्या अर्थसंकल्पात ओबीसींसाठी स्वतंत्र तरतूद करण्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. गेली 70 वर्षे ओबीसींच्या संघटना राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी करीत असून [ads id='ads1]
  सरकार या मागणीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. 50 टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ओबीसी समूहाच्या विकासाच्या योजना आखण्यासाठी ओबीसींच्या जनगणनेची नितांत आवश्यकता आहे.
 ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या आधारेच अर्थसंकल्पीय तरतूद होऊ शकते. गेल्या 70 वर्षांत ओबीसींना देशाच्या अर्थसंकल्पात 50 % लोकसंख्या असलेल्या ओबीसींना त्यांचा हक्काचा न्याय्य वाटा हिस्सा मिळालेला नाही.[ads id="ads2"] 
  प्रदीर्घ लढ्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले आहे. मात्र सातत्याने ओबीसी आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून आरक्षण विरोधी शक्ती ते आरक्षण संपवण्याचा डाव खेळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा एम्पीरिकल डेटा मागितला असून केंद्र सरकारने डेटा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. ओबीसींचे सर्व क्षेत्रातील आरक्षण वाचवायचे असेल तर राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेतून निर्माण झालेला डेटा उपलब्ध होणे आवश्यक आहे.  


त्याशिवाय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात सुटणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या भूमिकेचा फेरविचार केला पाहिजे. राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना केली पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करीत आहे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा ईशारा आम्ही देत आहोत.


यावेळी निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेशभाऊ ईखारे, वंचित बहुजन महिला आघाडीचे वंदनाताई सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जि.सचिव नागसेन सुरळकर, जिल्हा संघटक सलिम शेक, जिल्हा सघटक राजेद्र बारी,IT प्रमुख सचिन बा-हे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे, बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम,महासचिव नितिन सपकाळे,गणेश इंगळे भुसावळ तालुका सचिव, रूपेश कुर्हार्डे, देवदत्त मकासरे, मिराताई वानखेडे, वंदनाताई आराख, शोभाताई सोनवणे, प्रमिलाताई बोदळे, आशाताई सोनवणे, महेद्र सुरळकर, जरिनाताई तडवी, बंटी सोनवणे, गणेश जाधव भुसावळ शहराध्यक्ष , अतुल पाटील भुसावळ शहर उपाध्यक्ष , विजय सावकारे, गौरव तावडे,संतोष कोळी भुसावळ तालुकाध्यक्ष आदी पदधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!