Jalgaon ITI Breaking - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विविध व्यवसाय प्रवेशासाठी दुसरी फेरी 16 सप्टेंबरपासून...

अनामित

जळगाव -  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव संस्थेत विविध व्यवसायासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून इच्छूक उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. त्यानुसार 16 सप्टेंबर, 2021 पासून दुसरी प्रवेश फेरी सुरु होणार आहे. 
[ads id='ads1]

 तसेच बुधवार 15 सप्टेंबर, 2021 रोजी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली असून तसा संदेश (SMS) निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या नेांदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आलेला आहे. 

  दुसरी प्रवेश फेरी ही 16 सप्टेंबर, 2021 पासून ते 20 सप्टेंबर, 2021 पर्यंत सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5.00 वाजेपर्यत सुरु राहिल. पहिल्या प्रवेश फेरीअखेर संस्थेतील विविध व्यवसायांसाठी एकूण 606 जागा शिल्लक आहेत.

 तरी सबंधीत उमेदवारांनी आपल्या सर्व मुळ प्रमाणपत्रांसह व त्यांच्या छायांकित प्रतींसह आवश्यक त्या फीच्या रक्कमेसह दिलेल्या तारखेपर्यंत संस्थेत हजर राहून आपला प्रवेश निश्चित करावा. असे प्राचार्य ए. आर. चौधरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!