दारू पिण्यास नकार दिल्याने लाकडी दांडक्याने तरुणाचा खुन...

निनावी


कल्याण - झारखंड राज्यातील निवासी असलेल्या टिळकचौक रामवाडी परिसरात राहणारे दोघांनी अजय झल्ले रावत या 24 वर्षीय तरूणावर दोघे हल्लेखोरांनी मारहाण करून त्याला गंभीर दुखापत केल्याची घटना दिनांक ४ सप्टेंबरच्या पहाटे ०४ :०० वाजता पश्चिमेकडील अहिल्याबाई चौकात घडली होती.अजयचा रविवारी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित प्रकरणातील दोघा हल्लेखोरांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केले. 
[ads id='ads1]


रात्रीच्या वेळेस दारू पिण्यास नकार दिल्याने अजयला आरोपी सुनिल चौधरी (वय 27) आणि लुटो महलहार (वय 26) यांनी दांडक्याने हत्या केल्याच्याची घटना घडली आहे. या दोघे गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे, 


दोघेही टिळकचौक, रामवाडी परिसरात राहणारे असून ते मुळचे झारखंड राज्यातील निवासी आहेत.अजयकडे दोघांनी दारूची मागणी केली होती. मात्र अजयने नकार दिल्याने दोघांनी लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि नंतर त्याचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 


टिळक चौकातील एका बांधकाम साईटवर सापळा लावून बुधवारी दोघा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक यांनी दिली या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना आरोपींना गजाआड करण्यात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक (गुन्हे) राजेंद्र अहिरे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांना यश आले आहे.