[ads id=ads1]
बिहार - पश्चिम चंपारण जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. तर चौतरवा पोलीस ठाणे हद्दीतील मठिया सरेह या भागात गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका नराधम साधुने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. तर महिलेने याचा विरोध केल्याने आरोपीने तिची कुऱ्हाडीच्या धारदार शस्त्रानेवार करून निर्घृण खुन केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे.
तर मुलीच्या डोळ्यासमोर हा भयंकर प्रकार घडला आहे. कुऱ्हाडीने वार करून आरोपीने महिलेचं डोकं धडापासून वेगळं केलं. साधू हा महिलेच्या शेजारी राहत होता.
पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.एका हिंदी वेबसाईटच्या वृत्तानुसार सविस्तर असे की लक्ष्मीपूर निवासी असलेल्या तारा देवी गुरुवारी पहाटे आपल्या मुलीसह गवत कापत होती. तेव्हा तिच्या शेजारी राहणारा आरोपी मोतीलाल यादव तेथे पोहोचला आणि महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला. जेव्हा महिलेने वारंवार मोठ मोठ्याने आरडाओरडा करायला लागली तेव्हा त्याने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करताच आरोपी फरार झाला.
आरोपीने महिलेवर हल्ला केला तेव्हा तो साधुच्या वेशात होता. महिलेच्या मुलीसमोर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार अत्यंत भयंकर असून महिलेचं डोकं तिच्या धडापासून वेगळं होईपर्यंत तिच्या मानेवर वार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी साधुविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.