रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे ) रावेर येथील श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालयात सी.पी.बी.एफ.आय. हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात हा कोर्स सुरू करणारे नाईक महाविद्यालय पहिले ठरले आहे. देशातील नामांकित बजाज फिन्सर्व या फायनान्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीसोबत महाविद्यालयाने एम.ओ. यु. केला आहे.या करारांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक व रोजगारभिमुख असा हा कोर्स आहे. या कोर्सचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी. व्ही. दलाल यांच्या हस्ते करण्यात आले.
[ads id='ads1]
या वेळी नॅक समन्वयक डॉ.एस.आर. चौधरी प्राध्यापक व्ही. डी. पाटील प्राध्यापक एस.यु. पाटील हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संस्थापक स्वर्गीय विठ्ठलराव नाईक व बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बजाज फिन्सर्व कंपनीच्या सीएसआर प्रोजेक्ट प्रमुख अमृता नवल तसेच वालचंद प्लस कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर रश्मी मनसुखानी ह्या उपस्थित होत्या. उद्घाटन सत्रात बजाज फिन्सर्व कंपनीच्या वतीने अमृता नवल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रश्मी मनसुखानी यांनी या कोर्सचे महत्त्व आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉक्टर पी. व्ही. दलाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, महाविद्यालयातून पदवी प्राप्त झालेले व पदवीच्या शेवटच्या वर्षाला प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँकिंग ,फायनान्स व इन्शुरन्स क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा एक परिपुर्ण कोर्स आहे. या कोर्सच्या माध्यमातून रावेर परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील याचा आम्हाला आनंद आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोर्स समन्वयक प्राध्यापक एस. बी. धनले यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक सी.पी. गाढे यांनी करून दिला.
सूत्रसंचालन डॉक्टर जी.आर. ढेंबरे यांनी केले. तर आभार डॉक्टर एस. बी. गव्हाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर जी.आर. ढेंबरे प्राध्यापक प्राध्यापक एस. डी.धापसे, डॉक्टर बी.जी. मुख्यदल, प्राध्यापक उमेश पाटील ,प्राध्यापक एन.ए. घुले, शिक्षकेतर कर्मचारी श्री युवराज बिरपण ,श्री. आर. एस. पाटील श्री. सुनिल मेढे ,श्री. एस. के. महाजन, श्री. एम. टी. महाजन, श्री.आशिष घुगे ,श्री. फकीरा वाघ, श्री. निवृत्ती कोळी श्री. सतिष वाघ यांनी सहकार्य केले.