पुणे - राजगुरुनगर हॉटेलमध्ये झालेल्या बाचाबाची कारणावरून चुलत भावाने धारदार शस्त्रानंच चुलत भावाचाच दुचाकीवर गळा कापून खुन केल्याची धक्कादायक घटना (किवळे) ता खेड येथे घडली आहे.
[ads id='ads1]
रमजान आदम शेख रा.किवळे ता खेड असे या खून झालेल्याचं नाव आहे तर आरोपी रफिक पमा शेख रा. आहिरे ता खेड यांच्याविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत सुदाम शिवले (वय ३६ ) व्यवसाय शेती (रा. किवळे, ता खेड ) व रमजान शेख तसेच आरोपी रफिक शेख हे दिनांक ११ तारखेला दुपारी ०५ : ०० वाजता शिवले याच्या एकाच मोटारसायकलवर तिघे चांदूस येथे जात होते. पाईट ते शिरोली रस्त्यावर एका पोल्ट्री फार्म दरम्यान रमजान शेख व रफिक शेख यांचे हॉटेलमध्ये झालेल्या वादग्रस्त कारणावरून रफिक शेख याने धारदार हत्याराने रमजान शेख च्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. गळ्याला गंभीर जखमा झाल्याने रमजान शेख यांचा जागीच मुत्यू झाला. तर रफिक शेख चालत्या मोटरसायकल वरून उडी मारून पळून गेला.
या संबंधी घटनेबाबत चंद्रकांत सुदाम शिवले यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रफिक शेख हा फरार झाला असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल लाड करित आहेत