"राष्ट्रीय आदिवासी एकता परीषदे"चा दणका ;उपोषणाला बसताच प्रशासन खळबळुन जागी, तात्काळ घेतली दखल

अनामित
पाचोरा - जिल्हा जळगाव येथे नुकतेच "राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद" च्या माध्यमातून सुनियोजित आमरण उपोषण केले गेले. सदर उपोषणाची पार्श्वभूमि अशी की, हे उपोषण आदिवासी समुदाय आणि अनुसूचित जाति वर नेहमी होत आलेला अन्याय-अत्याचार, आणि वाढत्या समस्या विषयी होत. सदर उपोषणात सामिल अथवा सहभागी आदिवासी बंधु-बघीनी तसेच इतर समुदायातील लोक मोठ्या संख्येने उपस्तित होते.
[ads id='ads1]
 उपोषणचे सूत्रसंचालक/मार्गदर्शक-नेतृत्व हे "राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे" जळगाव जिल्हाध्यक्ष Adv. मा.रणजीत सुरेश तडवी होते. खुप सूत्रबद्धतेने,पारदर्शक नियोजन करून तसेच शासकीय-प्रशासकीय पातळीवर विचारविनिमय-सल्लामसलत करून ह्या उपोषणाचा प्रारम्भ करण्यात आला होता. उपोषणाची विशेषता अशी की,जो तो मिळेल त्या वाटेने, गाडीने, पायदळी गावखेड्यावरुन येऊन आया, बाया, माता बघीनी उपोषणात सक्रिय सहभागी होत होते.

सर्व सुरळीत होते, अचानक प्रशासकीय पातळीवर उपोषण संदर्भात सकारात्मक हालचाली सुरु झालेली कुनकुन कानी आली. पाचोरा-भड़गांव मतदारसंघाचे मा.आमदार  किशोर पाटिल कार्यकर्त्यांच्या समवेत हजर होऊन, संबंधित मा.तहसीलदार कैलाश गाढवे आणि उपविभागीय अधिकारी यांनी उपोषण स्तळी पाचारण केले. सर्व विचारांचे तर्क वितर्क होऊन निर्धारित मागण्या मंजूर - पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मा.आमदार  किशोर पाटिल यांचे कडे देण्यात आले.[ads id='ads2]

तसेच च्या आशयाचे लेटर (पत्र) ही Adv.मा.रणजीत तडवी यांना  सर्वासमवेत देण्यात आले. आणि उपोषण कर्ते जिल्हाध्यक्ष Adv रणजीत तडवी, सलीम तडवी यांनी नारळ पाणी प्राशन करून उपोषण मागणीपूर्तता होई पर्यन्त तापुरत्या स्वरुपात स्तगीत करण्यात आले. पण तरीही मागण्या पूर्ण होतीलच असा सुर जन सामान्यांमधुन निघत आहे.

आजच्या उपोषणामध्ये उपस्तित Adv.मा.रोहित ब्राम्हणेइंडियन लॉयर असोसिएशन जिल्हा अध्यक्ष, मा.दीपक आदिवाल राष्ट्रीय अत्यंत पिछड़ा वर्ग मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष,मा.विक्रमजी सोनवणे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ माजी जिल्हाध्यक्ष,लमा.नंदलाल आगारे जिल्हा मीडिया प्रभारी, यांनी उपोषणस्थळी आदिवासी बंधु बघिनि ना मार्गदर्शन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!