संजय मानकरे (विवरा प्रतिनिधी)
ग्रामीण भागात ग्राम सभेला फार विशेष महत्व व अधिकार दिले गेले आहे या सभेत ग्रामस्थाना आपले विषय मांडण्याचा अधिकार असतो तसेच मांडलेले विषय मंजुर करण्याचा हक्क आहे. [ads id="ads1"]
सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौ स्वरा संदीप पाटील होते तर प्रोसिडीग वाचन ग्राम सेवक श्याम पाटील यांनी केले या सभेत विविध प्रकारच्या समित्या स्थापन करण्यात आल्या. गेल्या दोन ते तीन वर्षा पासुन सतत तंटामुक्ती अध्यक्ष नवीन निवड करण्यात आली. त्यामघ्ये दहा जणानचे नाव नागरिकानी सुचवले होते त्यामुळे तंटामुक्ती अध्यक्षपद दयावे कोणाला असा पेच पडला होता नंतर ईश्वर चिठ्ठी टाकण्याचा लोकानी आग्रह केल्या मुळे ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली ईश्वरचिठ्ठी मध्ये भागवत रुपचंद महाजन यांच्या नावाची ईश्वर चिठ्ठी निघाली त्यामुळे त्याना तंटामुत्की अध्यक्ष भागवत महाजन यांच्या नावाची वर्णी लागली. नंतर ई पीक पाहणी शेतकन्याना मोबाईल द्वारे करता येत नसल्याने हाताने पेरे मांडण्यात यावे तसेच कृषी खात्याच्या योजना आणणे आणि शेती शिवार रस्ते तयार करणे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. [ads id="ads2"]
गावातील ज्या लोकाजवळ घर नाही अशा नागरिकाना घरकुला योजनेचा लाभ द्यावा असे या वेळी विषय मंजुर करण्यात आला.
गावातील ग्रामस्थाना वीज, पाणी,गटारी रस्ते आरोग्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली यावेळी रेशनिग कार्ड व धान्य या बाबत नागरिकाच्या फार मोठ्या समस्या निर्माण झाल्या रेशनिग दुकान बचत गटाना मिळावे अशी मागणी ग्राम सभेच्या ठरावात घेण्यात आली आणी रेशन दुकान बचत गटांना च मिळायलाच पाहीजे अशी चर्चा ग्राम सभेत सुरु होती .
यावेळी मराठी शाळेच चे मुख्याध्यापक यानी एक वर्ग डिजिटल करून द्यावा . कृषी खात्याच्या कृषी सहाय्यक बावीस्कर मॅडम ग्राम पचायत पंचायत समिती सदस्या सौ योगिता वानखेडे सरपंच सौ स्वरा पाटील सदस्य संदीप पाटील , सुनिल पाटील , दिपक गाढे सुभाष इच्छाराम पाटील सदस्या मंगला बखाल. माधुरी पाटील नसिम बी शेख शरीफ अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच पत्रकार अनिल मानकरे विकासो माजी चेअरमन भास्कर गाढे, सभेचे अध्यक्ष सरपंच सौ स्वरा पाटील व ग्राम सेवक श्याम पाटील यांनी जाहीर केले सभा शांततेत पार पाडण्या साठी निभोरा पोलिस स्टेशनचे पो हे कॉ गणेश सूर्यवंशी रा का पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला अनिल मानकरे सर्व ग्रा प कर्मचारी शिपाई दिनेश पाटील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व सहकार्य केले.



