रावेर (प्रतिनिधी ) महाराष्ट्रतील विविध घटका साठी तसेच ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक चे साठी नेहमी झटत असणारे नेते प्रसिद्ध सामजिक कार्यकर्ते पत्रकार श्री प्रशांत बोरकर यांची राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख राज्य प्रवक्ता आणि महाराष्ट्र राज्य महासचिव म्हणून नुकतीच निवड झाली आहे .
श्री प्रशांत बोरकर यांचा पत्रकारिता बरोबर जनता दल सह तिसरी आघाडी सरकार मधील अनेक राष्ट्रीय नेते मंडळीं शी त्यांचा जवळचा संबंध आहे . राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांनी पद भूषवले आहेत . विधान सभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून त्यांनी जाहीर केल्या प्रमाणे पाच वर्षांपेक्षा अधिक काळ राजकीय संन्यास घेतला होता . गेल्या काही वर्षापासून त्यांना अनेक ऑफर आल्या होत्या .[ads id="ads1"]
ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक समाजातील लोकांना तसेच शेतकरी बेरोजगार वर्गाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे धोरण राष्ट्रीय जनता दलाचे असल्याने प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आवाहनानुसार त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्य मधील सहकारी यांचे शी चर्चा करून राजद मद्ये प्रवेश घेतला . त्यांचे सोबत महाराष्ट्र सह मध्यप्रदेश आणि अन्य राज्यातील सहकारी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करणार आहेत. त्यांचे निवडीने महाराष्ट्र मध्ये तिसरी आघाडी मध्ये राजद चे महत्व वाढले आहे .[ads id="ads2"]
त्यांचे राज्य पातळीवरील निवडी बद्दल पक्षाचे नेते व बिहारचे विरोधी पक्षनेते श्री तेजस्वी यादव, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे, प्रसाद खामकर मुंबई, इमानदार अहमदनगर, कुमार कुंभार सांगली, नानाभाऊ ठाकरे वाशिम, डॉ. सुनील देवरे मुक्ताईनगर, जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील, रशीद तडवी, आदी शेकडो कार्यकर्ते व नागरीक यांनी अभिनंदन केले आहे .