रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे )रावेर तालुक्यातील खिरवड येथे आज दि. ५ सप्टेंबर रविवार रोजी बौद्ध समाज स्मशानभूमी मध्ये आज शिक्षक दिनानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप लहासे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
त्याप्रसंगी गावातील जेष्ठ मंडळी म्हणून प्रथम वृक्ष रोपण श्री दामोदर लासुरकर, आणि सामाजिक कार्यकर्ते श्री शे.जाहेर शे. हैदर यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्याचे कार्यक्रम झाले. त्यानंतर गावचे प्रथम नागरिक सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री निळकंठ नारायण चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री राजन लासुरकर यांच्या हस्ते ही वृक्ष रोपण करण्यात आले.[ads id='ads1]
सरदार जी.जी. हायस्कूल चे शिक्षक श्री गोकुळ चौधरी यांनी ही वृक्षारोपण केले त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य श्री शे.साहिल मिस्तरी आणि श्री सईद मण्यार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र कोंघे , ग्रामपंचायत लिपिक श्री संतोष गाढे, ग्रामपंचायत संगणक परिचालक हिरामण गाढे, ग्रामपंचायत शिपाई श्री काशिनाथ कोळी, रोजगार सेवक प्रदीप सुभाष पाटील, विवेक दिलीप लहासे, तेजस गाढे, महेंद्र गाढे ,पिंटू गाढे उपस्थित होते व सहकार्य लाभले अश्या प्रकारे आज बौद्ध स्मशानभूमी मध्ये शिक्षक दिनानिमित्त वृक्ष रोपण कार्यक्रम संपन्न झाला..