यावल प्रतिनिधी : बैठकीला प्रमुख उपस्थिती संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर तसेच उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते ॲड. गौतमजी साळुंखे , नियोजन समिति अध्यक्ष महेशजी तायडे , यावल तालुका अध्यक्ष विलास भास्कर , यावल तालुका उपाध्यक्ष संतोष गुप्ता बैठकीला संबोधीत करताना संस्थापक / अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांनी सांगितले की , संघटना महापुरुषांच्या विचारधारेवर कार्य करणारी आहे
संघटना ही सामाजिक असुन राजकिय नाही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की गाव तिथे संघटना संघटना कार्य करताना निपक्ष पणे कार्य करणार. संघटनेचा उद्देश बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. बैठकीला उपस्थित युवराज सोनवणे , अशोक तायडे , प्रमोदजी पारदे , सुनिल गोमटे , फारुखी सलाम , विकार खान , शुभम तायडे , आनंद तायडे , राजरत्न तायडे , अभिजीत तायडे , सागर तायडे , वैभव तायडे , गौरव तायडे , संदीप तायडे व इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .


