नेहरू युवा केंद्राचे पुरस्कारांसाठी 19 ऑक्टोबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

    जळगाव, दि. 27 (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : विकासात्मक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा मंडळांना पुरस्कार देण्याची योजना केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे. त्यानुसार नेहरू युवा केंद्र, जळगावतर्फे यावर्षी पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

   केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय संचलित नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी युवा मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप जिल्हा स्तरावर रुपये 25 हजार, राज्य स्तरावर रुपये 75 हजार, तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे 3 लाख, 2 लाख आणि पन्नास हजार व प्रमाणपत्र असे आहे. विविध विषयांवर कार्य करणाऱ्या आणि नेहरु युवा केंद्र, जळगावशी संलग्न  असलेल्या युवा मंडळानी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन नेहरु युवा केंद्र, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी श्री. नरेंद्र डागर यांनी केले आहे.

   अर्ज करण्याची मुदत 19 ऑक्टोबर, 2021 पर्यत असून अर्जाचा नमुना नेहरु युवा केंद्र, जळगाव जिल्हा कार्यालय (जयहिंद कॉलनी, द्रौपदीनगर, जळगाव) येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी  https://nyks.nic.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!