अंतुर्ली - येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात शिक्षक दिननिमित्त माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस वाचनालयाचे अध्यक्ष एस.ए भोई सर व उपाध्यक्ष शरद महाजन यांनी पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. माजी प्राचार्य एस . ए.भोई सर यांनी आपले विचार मांडताना शिक्षकाबद्दल माहिती दिली शिक्षकांबद्दल समाजामध्ये कायम ,आदराचे आणि मान सन्मानाचे स्थान आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करतात स्वतःचा आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजा समोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजाला घडविणारे शिल्पकार आहेत. शिक्षण ,एकात्मता, विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान एकमेकांना पूरक आहे. असे प्रतिपादन केले .
[ads id='ads1]
याप्रसंगी सेवानिवृत्त मी. फ. तराळ विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सुभाष सुकलाल भोई, माजी मुख्याध्यापक श्री भास्कर सुखदेव वानखेडे, गुरुवर्य जनार्दन पाटील, माजी मुख्याध्यापक जी .जी .चौधरी, संगळकर सर,बारी सर सरपंच पती सुपडू शिरतुरे, मोहन बेलदार यांचाही सत्कार करण्यात आला. पोलीस पाटील त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक ,ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख भैय्या शेख करीम, जनता शिक्षण मंडळाचे संचालक दिनेश पाटील ,पीक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन भाऊराव महाजन ,विक्रांत सावकारे , महेंद्र मेढे,शेख बाबू हुसेन, पंजाबराव पाटील ,लोणकर साहेब ,देशमुख सर, पंकज पाटील ,शाकीर शेख, किशोर मेढे, नामदेव मिठाराम भोई, अशोक सपकाळ,राज चौधरी, भानुदास टेलर व मान्यवर, नागरिक, वाचक, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल वाडीले यांनी केले व आभार बी. डी बारी सर यांनी मानले.
