रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे ) मुंबईतील साकीनाका परिसर येथे घडलेल्या घटनेने सा-या महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. हि घटना अतिशय घृणास्पद, अपमानास्पद, लाजिरवाणी व तेवढीच मनाला सुन्न करणारी असल्याने यामुळे संपूर्ण महिला दहशतीत असून या घटनेचा रावेर तालुका महिला सुरक्षा संघटना निषेध केला आहे.[ads id='ads1]
साकीनाका येथील बलात्कार व नंतर निर्घुण हत्या करणा-या आरोपीला कठोर शासन होवून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच अशा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांपासून महिलांना संरक्षण मिळावे ; अशा मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना देण्यात आले आहे.
संघटनेच्या प्रदेश सचिव सिमाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य शाखा रावेर यांच्या वतीने तिव्र निषेध नोंदवून निवेदन देण्यात आले. यावेळी महिला सुरक्षा संघटनेच्या तालुकाध्यक्षा कांता बोरा, सचिव कल्पना पाटील, उपाध्यक्षा शारदा चौधरी, सहसचिव भाग्यश्री पाठक, जनसंपर्क प्रतिनिधी सुनिता डेरेकर, मिडिया प्रमुख मनिषा पाचपांडे आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होत्या.