या गाण्यात मुंबई चित्रपट सृष्टीतील अभिनेता राहूल पाटील व अभिनेत्री आश्विनी गोपाळे यांची मुख्य भुमिका आहे. तसेच चित्रपटाचे निर्माता राहुल पाटील व सह निर्माता विकास इंगळे आहेत. गाण्याच्या संपूर्ण चित्रीकरणाची जबाबदारी विटवा येथील रॉकी अढागळे यांची आहे.
गाण्यात छांयाकणाचे काम प्रणव पाटील विटवा यांची असुन, गाण्यात प्रोडक्शन मॅनेजर अनिकेत सोनटक्के, नृत्य दिग्दर्शक नितीन कोळी व प्रफुल कोळी, कार्य निर्माता निखिल सोमशे व गाण्याच्या संगीतात डफ वादक म्हणुन - मुकेश मोल यांची भुमिका आहे. [ads id="ads2"]
या चित्रीकरणासाठी सागर पाटील (सिंगनुर), महेंद्र सोनवणे (विटवा) सुमित गुरव (सिंगनुर), प्रशांत कावा, गौरव कोळी, अतिशय मोलाचे सहकार्य लाभले आहे. या मराठी गाण्यामुळे रावेर तालुक्यात देखिल चित्रीकरणासाठी पोषक असे वातावर आहे. असे या गाण्याला बघुन वाटते. म्हणुन जळगाव जिल्ह्यातील युवा मुलांना यात आपले करीअर बनवायचे असेल तर त्यासाठी लागणार पोषक वातावरण हे जळगाव जिल्ह्यात आहे, असा विश्वास 'सपन सपन' या मराठी गाण्याच्या सर्व सदस्यांना टीमला वाटतो.