रावेर तालुका प्रतिनिधी ( राजेश रायमळे )ऐनपुर सुलवाडी कोळोदे रस्त्याचे आमदार निधीतून काम चालू असून बर्याच दिवसांपासून काम बंद असल्याने ते त्वरित पूर्ण करावे अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. [ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की,ऐनपुर सुलवाडी कोळोदे रस्त्याचे काम आमदार निधीतून चालू असून काही दिवसांपासून ते बंद आहे,रसत्या लगतच्या शेतकर्यापैकी संजय रामचंद्र हिरोळे यांचे द्वारे प्राप्त माहितीनुसार सदर रस्त्यावरून पावसाळ्यात पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा विल्हेवाट लावणे कामी चार्या खोदून त्यात पाईप बसवणेकामी बर्याच दिवसांपासून पाईप आणून ठेवलेले आहेत मात्र अद्याप ते बसवलेले नाहीत. [ads id="ads2"]
त्यामुळे पावसाचे पाणी वाहून रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात ते कायम साचून असते,व त्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.तरी चार्या खोदून त्वरित पाईप बसवून सदर रसत्याचे काम पूर्णत्वास न्यावे अशी आग्रहाची मागणी रसत्यालगतच्या शेतकऱ्यांकडून होत आहे.