रावेर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 226 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर  यांच्या 226 व्या पुण्यतिथी निमित्ताने आज दि. ६ सप्टेंबर सोमवार रोजी रावेर तालुका भारतीय जनता  पार्टी कार्यालयात प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष  माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती व किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र प्रमुख मा. सुरेश  धनके , जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर  महाजन,   [ads id="ads2"]  भाजपा तालुका अध्यक्ष राजन लासुरकर, जिल्हाध्यक्ष धनगर समाज महासंघ,व भटके विमुक्त जिल्हा उपाध्यक्ष भाजपा मा.हीलाल सोनवणे, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे ,माजी जिल्हा परिषद सदस्य अहमद जबरा तडवी,पीपल बॅंकेचे चेअरमन ऍड प्रवीण भाऊ पाचपोहे,ऍड भास्कर निळे , धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा उपाध्यक्ष लखन भाऊ सावळे, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, पं.स. सदस्य पी के महाजन,लीलाधर भाऊ महाजन, प्रकाश पाटील,शुभम नामयते,स्वप्नील लासुरकर सर, यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!