रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)
जळगाव- संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पूर्णपणे सक्रिय होणार असून त्यात युवा नेतृत्वास प्राधान्य दिले जाणार आहे. येणा-या रावेर पालिकेच्या निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेड प्रत्येक वार्ड साठी एक उमेदवार देणार आहे.[ads id="ads1"]
एकूण 21 उमेदवार लढणार आहेत त्याकरिता संभाजी ब्रिगेडच्या रावेर शहरातील युवा कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे प्रतिपादन आणि आवाहन संभाजी ब्रिगेडचे रावेर शहराध्यक्ष मोरेश्वर सुरवाडे यांनी बैठकीत केले. सदर बैठक रावेर तालुका शेतकी संघात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे रावेर तालुकाध्यक्ष विनोद चौधरी होते.[ads id="ads2"]
व्यासपीठावर रावेर तालुका कार्याध्यक्ष योगेश महाजन, रावेर तालुका उपाध्यक्ष महेंद्र पाटील, पी आर पाटील सर, हरीश पाटील, घनश्याम पाटील, राजेंद्र चौधरी, योगेश साहेबराव पाटील, प्रशांत पाटील, महेश माळी, विनोद धनगर, अमोल कोल्हे, मनोज तायडे, इमरान शेख, किरण महाजन आदींसह मोठ्या संख्येने तालुक्यातील व शहरातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
युवा कार्यकर्त्यांना समाजकारणा बरोबरच राजकारणात लोकप्रतिनिधीत्व करण्याची इच्छा आहे. त्याकरिता मोठ्या संख्येने युवा वर्ग संभाजी ब्रिगेड कडे येत आहे. रावेर शहरातील येणारी नगरपालिका निवडणूक संभाजी ब्रिगेड पूर्ण जागांवर लढवणार असून त्याकरिता युवांनी आतापासूनच तयारी करावी त्यांना संधी मिळणार आहे. असेही शहराध्यक्ष मोरेश्वर सुरवाडे यांनी सांगितले. रावेर तालुका अध्यक्ष विनोद चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका यासाठीही तालुक्यातील युवांना संधी देण्यात येणार आहे त्याकरिता त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. आभार प्रशांत पाटील यांनी केले. सदर बैठकीस अपेक्षेपेक्षा जास्त युवा कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड च्या बैठकीसाठी उपस्थित होते. त्यांचे संभाजी ब्रिगेड मध्ये नोंदणी करण्यात आली. इच्छुकांनी संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे संपर्क कार्यालय रावेर शेतकी संघ येथे तालुकाध्यक्ष विनोद चौधरी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले.


