महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती सदस्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकेचा सत्कार..

अनामित
नंदुरबार - महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती सदस्यांच्या हस्ते कोरोना संकटाच्या काळात चांगली कामगिरी करणाऱ्या नर्मदा किनाऱ्यावरील गावातील अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला.
 [ads id=ads1]
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीपूर्वी समिती प्रमुख आमदार सरोज अहिरे आणि सदस्य आमदार यामिनी जाधव, मंजुळा गावीत, डॉ.मनिषा कायंदे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, अवर सचिव विजय कोमटवार आदी उपस्थित होते.
 कोरोना संकटाच्या काळात दुर्गम भागात पोषण आहार पोहोचविणाऱ्या पिंपळखुटा प्रकल्पातंर्गत चिमलखेडीतील रेलू वसावे, मणीबेली येथील संगिता वसावे, बामणी येथील सुमित्रा वसावे, कोराईपाडा येथील कुंदा वसावे, डनेल येथील वनिता पाडवी तसेच कुंडीबारी येथील शकिला पाडवी यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सर्व समिती सदस्यांनी या अंगणवाडी सेविकांच्या कामगिरीचे कौतुक केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!