महाराष्ट्रातील निर्बंध कधीपासून कडक होणार? याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले? वाचा सविस्तर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 Rajesh Tope


मुंबई : - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा (corona third wave) धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं (Corona Prevention Rules) पालन करावं, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलं आहे. [ads id="ads1"]

तसेच यावेळी राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील निर्बंधांबाबतही माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत आरोग्य विभाग (Health Department) आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

रुग्णसंख्या कुठे वाढत आहे ? का वाढत आहे, यावर विशेष लक्ष आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सल्लाने पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. [ads id="ads2"]

असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं. नागपूरच्या (Nagpur) बाबतीत तेथील आकडे आणि परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

निर्बंध कधीपासून कडक होणार ?

राजेश टोपे यांनी सांगितले की, ऑक्सिजनच्या बाबतीत गेल्या वेळी 1300 मेट्रिक टनापर्यंत आपली क्षमता होती. आता 1400 ते 1500 मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे.

ऑक्सिजनच्या 450 प्लान्टची उभारणी करण्यात येत असून त्यातील अडीचशे प्लान्टस उभारले आहेत. उर्वरित प्लान्ट लवकरच कार्यान्वित होतील.

ज्या दिवशी 700 मेट्रिक टनाच्यावर ऑक्सिजनचा वापर होईल त्यावेळी निर्बंध सुरु करु. अशा प्रकारची आधिसूचना (Notification) आरोग्य विभागाने काढली आहे.त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असे टोपे यांनी सांगितले.

5 जिल्ह्यात रुग्णांची संख्या अधिक


केरळमध्ये ओणमच्या (Kerala Onam) सणानंतर रुग्णवाढ झाली आहे.

एका-एका दिवसात 31 हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे.

गर्दी करुन नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झालं आहे.

आज राज्यातील 4 ते 5 जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्के रुग्ण संख्या आहे.

त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

त्यामुळे शिस्त पाळावीच लागले, असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!