यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आमदार अतुल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

अनामित
गटनेता राकेश कोलते एजाज पटेल,फारुख हाजी,गणेश महाजन,धिरज महाजन यांचे उत्कृष्ट नियोजन.
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक आणि यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांचा रविवार दि.12 सप्टेंबर 2021रोजी अभिष्टचिंतन सोहळा श्री गजानन महाराज मंदिरात आणि त्यानंतर संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि नियोजन पूर्वक पार पडला [ads id='ads1]

या अभिष्टचिंतन सोहळ्याची जय्यत तयारी आणि नियोजन यावल नगरपरिषदेचे गटनेता राकेश कोलते. एजाज पटेल, फारूक हाजी, गणेश महाजन धिरज महाजन,मोसिन कुरेशी,असलम मेंबर,समीर मेंबर,आशिष पाटील यांच्यासह सानेगुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील सर यांनी आपल्या मालकीची जागा स्नेह भोजनासाठी उपलब्ध करून उत्कृष्ट नियोजन केले होते.
        
 यावल नगरपरिषद माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेता राकेश कोलते नगरपरिषद संचालित सानेगुरुजी विद्यालयातील उपशिक्षिका सौ. कविता कोलते यांनी सपत्नीक माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांना पुष्पहारगुच्छ,श्रीफळ देऊन सत्कार केला त्यानंतर सर्व स्तरातील हितचिंतकांनी, मित्रमंडळींनी,राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, समाजसेवकांनी सानेगुरुजी विद्यालयातील शिक्षकांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अतुल पाटील यांना वाढदिवसानिमित्त आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!