राजेंद्र चौधरी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..

अनामित
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे )रावेर तालुक्यातील रोझोदा येथील राजेंद्र चौधरी यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी कळविले आहे.
      
 कोरोनाच्या कालावधीत पितृछाया हरवलेल्या गरजू विद्यार्थिनीला शिक्षणासाठी नुकतीच मदत केलेले,विविध,सामाजिक,शैक्षणिक ,साहित्यिक क्षेत्रासह इतर उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन रावेर तालुक्यातील रोझोदा येथील रहिवासी राजेंद्र तुळशीराम चौधरी यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येईल असे संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी कळविले आहे.
     
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग पाच वर्षांपासून काव्यवाचन करीत असलेले सावदा येथील ताप्ती सातपुडा साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त राजेंद्र चौधरी यांचा पहिला स्वलिखित अमृतवेल कविता संग्रह असून दिवा तुळशीरामाचा हा दुसरा कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.उल्लेखनीय कार्याबद्दल माजी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्याहस्ते त्यांना गौरविण्यात आले होते.
         
मुंबईच्या बोरीवली येथील हरचंद लोखंडे माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री.चौधरी हे कवी,इंंडिया २४ तासचे पत्रकार असून मुंबई ध्यास कवितेचा काव्य मंचचे सचीव आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!