जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील (Jalgaon District Police Headquarters) महिला दक्षता विभागातील (Women's Vigilance Department) सहायक पोलीस उपनिरीक्षकाला (ASI) 20 हजाराची लाच घेताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) सापळा रचून (Jalgaon Anti Corruption) अटक केली आहे.[ads id="ads2"]
लाचलुचपत प्रतिबंधक विभागने ही कारवाई बुधवारी (दि.13) दुपारी सापळा रचून (Jalgaon Anti Corruption) केली. या कारवाईमुळे जळगाव पोलीस मुख्यालयात खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]
मिलींद केदार (Milind Kedar) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मुख्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या महिला दक्षता समिती कार्यालयात केदार यांनी एका प्रकरणात तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीमध्ये 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव एसीबीकडे (ACB) तक्रार दिली.
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पथकाने पडताळणी करुन सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच घेताना केदार यांना रंगेहाथ (Anti Corruption) पकडण्यात आले.
ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील (Deputy Superintendent of Police Shashikant Patil)
यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav) यांच्या पथकाने केली.

