किनगाव येथील शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल : तालुक्यातील किनगाव येथील शेजमजूराने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल गुरुवारी दुपारी उघडकीस आली. राजु रामसिंग कोळी (वय-४७) असे या आत्महत्या केलेल्या शेतमजूरचे नाव आहे.[ads id="ads2"] 

दरम्यान मागील तीन दिवसात किनगाव गावातील एकाच गल्लीतील ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

किनगाव येथील शेतमजूर राजु कोळी हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आज गुरूवारी १४ ऑक्टोबर रोजी राजू कोळी यांची पत्नी शेतात कामाला गेल्या होत्या. घरात कुणीही नसल्याने घर बंद करून छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

  मयताचा मोठा भाऊ अशोक कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मागील तीन दिवसात किनगाव गावातील एकाच गल्लीतील ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!