रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) - दसरा दिवाळी सारखा सण मात्र त्यात मोलमजुरी करणाऱ्या सुशिलाबाई बारी यांच्या घरात सणासुदीच्या काळात गॅसच्या स्फोटात घर उध्वस्त रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील घटना बारी घाट परिसरात राहणाऱ्या सुशिलाबाई जगन्नाथ बारी (वय ६६) या शेतात मोलमजुरी करणाऱ्या महिल ह्या त्यांच्या मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह सोबत राहत असत मात्र आज आज (दि. १५ वार शुक्रवार सण दसरा) सकाळी ०६:२९ वाजेच्या सुमारास पहाटे गॅसवर चहा करत असताना
[ads id="ads1"] अचानक गॅसच्या नळीने पेट घेतला. आणि गॅसने भडका घेताच घरातील सर्वजण घाबरून घराबाहेर पळाले आणि आगीने रौद्र रूप धारण केले आणि नंतर झालेल्या स्फोटात पत्र्याचे घर आणि घरातील सर्व सामान अक्षरश:
[ads id="ads2"] राख होऊन उध्वस्त झाले . हा स्फोट इतका भयानक होता की, गॅस सिलेंडरचे दोन तुकडे झाले. या घराच्या विटांचे आणि मातीचे तुकडे शंभर- दोनशे मीटर अंतरावर जाऊन पडले आणि घरावरील पत्रे, लोखंडी कपाट, संसारोपयोगी साहित्य आगीत जळून नष्ट झाले. बारी परिवार अतिशय गरीब असून मोलमजुरी करणारा आहे. सुशीलाबाईचा मुलगाही भाजी विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवतो. आता ऐन दसऱ्याच्या दिवशी घरात पिण्यासाठीही पाणी नाही. घरातील संसारोपयोगी सामान लोखंडी कपाट अंथरूण-पांघरूण सर्व जळून नष्ट झाले आहे."
