चाळीसगाव - पाटणा गावाजवळ असलेल्या जंगलात गुरढोर सांभाळण्याचे काम करणाऱ्या गणेशपूर येथील ज्ञानेश्वर पाटील (नाना) यांचा निर्घृण खुन झाल्याचे उघडकीस झाले आहे, तर मृत व्यक्तीचे वय ५० वर्षीय होते [ads id="ads2"] डोक्यात धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे संबंधित प्रकाराबाबत चाळीसगाव ग्रामीण पो. स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन. सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील ज्ञानेश्वर संतोष पाटील (नाना वय-५०) हे पाटणा गाव लगतच्या वनक्षेत्रातील जंगलात गुरेढोरे सांभाळण्याचे ते काम करीत असत.
[ads id="ads1"]
नाना हे नेहमीप्रमाणे गुरेढोरांची सांभाळ करीत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे हात-पाय बांधून धारधार शस्त्राने डोक्याच्या मागच्या बाजूला वार करून निर्घृण खुन केल्याची थरारक घटना ५ ऑक्टोबर पहाटे वेळ ०८:३० ते ६ ऑक्टोबर सायंकाळी ०४ : ०० वाजताच्या सुमारास घडली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. काही एक कारण नसताना ज्ञानेश्वर संतोष पाटील(नाना) याची हत्या करण्यात आल्याने परिसरात भितीची लाट पसरली आहे.
संबंधित गुन्ह्याचा तपास ग्रामीण पोलीसांकडून सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ठेंगे साहेबांनी दिली आहे. तर निलेश ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपास सुरु असल्याचे सांगितले.