[ads id="ads2"]
यावल येथे राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेला शुभांगी जुगल पाटील( रा. गवत बाजार मेनरोड यावल) या गृहिणी महिला आहे. यांनी रिमार्ट शॉपी कंपनी चे मालक विलास मोतीराम राठोड (वय-४५ रा. अंबेजोगाई रोड ता. रेणापूर जि. लातूर) यांच्या "999 ब्रॉण्ड बाजार" या नावाने असलेल्या
[ads id="ads1"] रिटेल शॉपी इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेस वस्तू विक्री करण्याकरीता शुभांगी पाटील यांना दुरध्वनी द्वारे संपर्क केला असता. महिलेने राठोड यांच्या सांगण्यावरून वेळोवेळी साडे चार लाख रूपये दिलेल्या बँक अकाऊंटमध्ये जमा करत गेले. तरी देखील राठोड नामक व्यक्तीने कोणत्याची पध्दतीचा मोबदला दिलेला नव्हता. तर पैसे देखील परत केले नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शुभांगी पाटील यांनी यावल पोलीसात धाव घेतली फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विलास राठोड याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि करीत आहे.