मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या आईंनाही कोरोनाची लागण झाली असून वरिष्ठ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे.[ads id="ads2"]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती. [ads id="ads1"]
त्यात राज ठाकरे यांच्या आईंची कोरोना चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री, मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहेत.
अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय लिलावती हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेत आहेत.