रावेर - तालुक्यातील सावदा शहरात देवकरवाडा भागात भाड्याच्या घरात राहणारे ४३ वर्षीय भूषण दत्तात्रय महाजन (रा. खिर्डी ता. रावेर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सावादा येथे उघड झाली झाली आहे. [ads id="ads1"]
तर मयत भुषण महाजन हे देवकरवाडा येथील शरद कुरकुरे यांच्या घरात भाड्याने राहता होते. त्यांनी दि. ०९ /ऑक्ट/२०२१ वार शनिवार रोजी सकाळी अथवा दुपारच्या वेळे दरम्यान
[ads id="ads2"] भाड्याच्या घरात किचनमध्ये छतास असलेल्या लोखंडी हुकाला नायलॉन दोरीने गळ्याला फास लावून आत्महत्या केली अश्या माहिती सह सावदा पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि इंगोले, यांच्या मार्गदर्शनाखाली हेपोकॉ उमेश पाटील हे करीत आहे.