महाराष्ट्र बंद च्या दिलेल्या हाकेला लोक संघर्ष मोर्चा व संयुक्त किसान मोर्चाचा पाठींबा - प्रतिभाताई शिंदे

अनामित
 जळगाव - उत्तर प्रदेश मधील लखिंमपुर येथे केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्रा च्या कार्यक्रमाच्या वेळी शांततामय मार्गाने निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर जाणूनबुजून मंत्री अजय मिष्राच्या मुलाने आशिष मिश्राने निर्दयीपणे गाडी घातली व चार शेतकऱ्यांना अमानुषपणे जागच्या जागी चिरडून ठार केले
[ads id="ads1"]
 व कित्येक शेतकरी आणि पत्रकार मित्र जखमी केलेत ह्या घटने नंतर केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्रा यांनी तात्काळ राजीनामा देणे व त्यांच्या मुलासह त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होण्या ऐवजी ज्या पध्दतीने उत्तर प्रदेश चे योगी सरकार व त्यांचे पोलीस ह्या आरोपींना अभय देता आहेत याचा अर्थ लखिमपुर मधील शेतकऱ्यांची हत्या ही सरकारी अभय असलेली व शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी केलेले कृत्य होते हे सिध्द होते आहे. त्याच बरोबर हरियाणाचे मुख्यमंत्री पदावर असलेले खट्टर भाजपच्या कार्यकर्त्यांना जाहीर रित्या भाषणात सांगतात (ज्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि मग माफी मागितली) की शेतकऱ्यांना डोके फुटे पर्यंत मारा हे असे बेजबाबदार विधान करण्याची हिम्मत सत्ताधारी करतात कारण त्यांना लोकशाही मान्य नाही व मसल आणि मनी पॉवर मधे आम्ही काहीही करू शकतो हा यांच्या उद्दाम पणाला आम्ही संयुक्त किसान मोर्चाशी सलग्न संघटना मागील ११ महिन्यापासून संविधानाच्या चौकटीत लोकशाही मार्गाने संघर्ष करीत आहोत व जो पर्यंत केंद्र सरकार तीन कृषी कायदे रद्द करीत नाहीत तो पर्यंत आम्ही दिल्लीच्या सीमांवर लढत राहू व शक्य असेल तेव्हा राज्याराज्यांत संघर्ष ही उभा करू. 
[ads id="ads2"]
केंद्र सरकार व त्याच पक्षाचे सरकार असलेले राज्य सरकारे ज्या पध्दतीने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत ह्या विरुद्धच्या आमच्या लढ्याला बळ मिळावे व शेतकऱ्यांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही ह्या महाराष्ट्रतील महाविकास आघाडीच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो व लोक संघर्ष मोर्चा च्या जळगाव ,नंदुरबार, बुलढाणा,धुळे, औरंगाबाद, पुणे, सातारा ,नाशिक , यवतमाळ येथील सर्व प्रतिनिधी या आंदोलनात सामील होतील व हा बंद महाराष्ट्रातील व्यापारी, कामगार, आणि सामान्य नागरिकांनी यशस्वी करत आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याच्या लढयाला बळ द्यावे असे आव्हान ही लोक संघर्ष मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभा शिंदे, कथा वसावे, सचिन धांडे,आतिश जगताप, भरत कर्डिले, प्रकाश बारेला,ताराचंद पावरा, ईश्वर पाटील (लाला सर), चंद्रकांत चौधरी, अशोक पवार, पन्नालाल मावळे, सुप्रिया चव्हाण, तेजस्विता जाधव, केशव वाघ, सोमनाथ माळी यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!