Raver Pal || पाल वन अधिकाऱ्याकडून दोन आदिवासी तरुणास चाप्टा बुक्क्यांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी ; जंगलात दिसले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही

अनामित

पाल येथे ही अनेकदा असे प्रकार या अधिकारी कडून घडले आहे 

पाल ता रावेर (वार्ताहर) पाल येथील प्रादेशिक वन विभागातील क्षेत्रपाल पाल वन कर्मचारी मुकेश महाजन तथा वन अधिकारी महाजन पूर्ण नाव माहीत नाही यांनी कारण नसताना जंगलात दिसले म्हणून दोन आदिवासी तरुणास चाप्टा बुक्क्यांनी मारहाण करून यानंतर जंगलात दिसले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना घडलेली आहे.
[ads id='ads1]

सविस्तर वृत्त असे की, लोहारा ता. रावेर शिवारात ईदगाह व धरण चे दरम्यान रावेर रोडवर सार्व.जागी व ठिकाणी काही कारण नसताना दि. २९ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दिलीप भारसिंग बारेला व त्याचे साथीदार फरिद सायब तडवी रा. गुल्ली लोहारा ता. रावेर जि. जळगांव या दोन्ही आदिवासी तरुणांना चापटा बुक्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ देऊन इकडे जगलात फिरताना दिसले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. वगैरे मजकुराची तक्रार थेट सावदा पोलिस ठाण्यात येऊन दिलीप भारसिंग वारेला यांनी दिल्यावर पाल वन कर्मचारी मुकेश महाजन तथा वन अधिकारी महाजन पूर्ण नाव माहीत नाही रा. रावेर यांच्या विरुद्ध र.नं.४८९/२०२१ भादवी कलम ३२३, ५०४,५०६ प्रमाणे गुन्हादाखल करण्यात आलेला आहे. 


यावेळी सावदा पोलिस ठाण्याच्या बाहेर ४० ते ५० लोहारा येथील आदिवासी बांधव देखील उपस्थित होते.
पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित आदिवासी बांधव सदरील वन विभागाचे अधिकारी महाजन हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी व स्वतःकरिता मासेमारी करून पार्ट्या खातात कार्यालयात व जंगलात वेळनुसार उपस्थित न राहता रोजंदारीचे माणसाला (पंटर) भरोसे सर्व काही कारभार चालवतो. व मनमानी करतात असे 
उघडपणे बोलत होते.


पाल येथेही अनेकदा गोर गरीब आदिवासींन रस्त्यानेही चालताना दिसले तरी काहीही कारणे नसतानाही मारहाण केली असून दमदाटी देऊन धमकी देण्याचे प्रसंग घडले आहे प्रशासनाने त्यांना वनसंरक्षण करण्याकरिता नियुक्त केले आहे गरीब आदिवासीना मारहाण आणि धमकवण्या करिता नियुक्ती केली नाही 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!