टोपी न घालणाऱ्या,शर्टचे बटन न लावणाऱ्या चालकांची मनमानी आणि दादागिरी ; जळगाव जिल्ह्यात एस.टी. महामंडळाचे नियम खड्ड्यात.

निनावी
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) जळगाव जिल्ह्यात एस.टी. महामंडळ अंतर्गत यावल आगारातील एक चालक आणि नेहमी जळगाव-विदगाव- किनगाव-यावल बसवरच चालक म्हणून कार्यरत असलेला एक चालक एस.टी.महामंडळाचे सर्व नियम खड्ड्यात घालून सोयीनुसार ड्युटी आणि मनमानी करीत असल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
    [ads id="ads1"]
   शुक्रवार दि.15ऑक्टोंबर2021रोजी एस.टी.महामंडळाचे जळगाव विभाग प्रमुख यांचे जळगाव डेपोतून दुपारी3वाजेच्या सुमारास जळगाव विदगाव किनगाव मार्गे यावल येणाऱ्या एस.टी.बस क्र 2646 वरील चालकाने जळगाव येथून दैनिक साईमत चे पार्सल पास बघून घेतले परंतु यावल येथे ते पार्सल देण्यासाठी पार्सल घेणाऱ्या मुलाला एस.टी. महामंडळाच्या नियमांचा धाक दाखवून पार्सल दिले नाही पार्सल यावल डेपो जमा केले आहे किंवा नाही
[ads id="ads2"]
 हे यावल आगार प्रमुख यांनाच माहिती असेल परंतु संबंधित पार्सल दिले नाही.प्रत्यक्ष चालकाशी चर्चा केली असता त्यावेळेस स्वतः चालकांने मात्र एस.टी.महामंडळाचे सर्व नियम खड्ड्यात घालून,स्वतःच्या डोक्यात टोपी न घालता तसेच शर्ट चे वरील दोन ते तीन बटन न लावता दादागिरीची असभ्य वागणूक देऊन मी कायद्याचा मोठा भक्त आहे असा देखावा केला.परंतु हा चालक जळगाव विदगाव रोडवर एखाद्या गावात राहणारा आहे का?कारण त्याला त्याच मार्गावरील ड्युटी सतत मिळते कशी?तसेच एस.टी महामंडळाच्या नियमानुसार सदर चालक हा प्रवाशांना उद्धटपणाची वागणूक देत आहे तसेच एस.टी. बसला फलक न लावता महामंडळाने निश्चित केलेल्या थांब्यावर एस.टी.बस न थांबविता बस सुसाट वेगाने पळवून प्रवाशांची पिळवणूक करीत आहे रोज रोज एकाच मार्गावर एस.टी. बस चालवून या चालकाला प्रवाशांचा कंटाळा आला आहे का? महामंडळ आणि निश्चित करून दिलेला पोशाख/ ड्रेस का वापरत नाही.शर्टवर लायसन बिल्ला आणि नावाचा उल्लेख का नाही.त्यामुळे चालक आहे किंवा नाही किंवा एखादा प्रवासी आहे का?असा प्रश्न प्रवाशांना पडत असतो.

चालक म्हणतो तुम्ही प्रसिद्धीमाध्यमांनी ठळक मोठ्या अक्षरात माझी बातमी लावली तरी माझे कोणी काही वाकडे करू शकणार नाही असे बोलला.तरी या चालकाच्या मनमानी वागणूकीडे एस.टी.महामंडळ जळगाव विभाग प्रमुख यावल आगार प्रमुख यांनी लक्ष केंद्रीत करून चौकशी करून कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल तालुक्यातील प्रवासीवर्गात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!