नागपूर प्रतिनिधी (सुशिल कुवर) न्यायप्रिय महात्मा राजा रावण अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारसाचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे व विविध गुणांचा समुच्चय आहे. राजा रावण महान दार्शनिक, संगीत तज्ज्ञ, राजनीतिक, शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, उत्कृष्ट नगररचनाकार, समताधिष्ठित, समाजव्यवस्थेच्या उदगाता, साहित्यिक, न्यायप्रिय राजा अशा अनेक गुणांचा आविष्कार करणारा महानतम राजा होता. [ads id="ads1"]
राजा रावण हा मूलनिवासी आदिवासी समुदायाच्या महासम्राट होता. हजारो वर्षापासून मूलनिवासी आदिवासी त्याची पूजा करतात, त्याला आपला महानायक, शूरवीर योद्धा, महाज्ञानी, बलाढ्य शक्तीसाली विद्वान, अनेक शास्त्रांचा अभ्यासक व शंभुचा पुजारी मानतात.
[ads id="ads2"] आजही रावण पूजा मेघनाथ पूजा करतात. तामिळनाडूमध्ये रावणाची 352 मंदिरे आहेत. सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे छत्तीसगढ, मध्यप्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्रातही अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह सर्वत्र राज्यभर राजा रावणाची पूजा केली जाते.
अशा या महान राजाला इथल्या षड्यंत्रकारी वर्णांध व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. खलनायक म्हणून प्रसिद्ध केले आहे. परंतु सत्य लपून राहत नाही ते कधी ना कधी उघड होतेच. आदिवासी समाजातील व इतरही समाजातील संशोधक साहित्यिक यांनी रावणाचा खरा इतिहास शोधून काढला व जगासमोर मांडला आहे.
रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहे. अनार्यांच्या तो महासम्राट होता. परंतु 1930 पासून त्याला जाळतात. त्यांच्या बद्दलचा राग द्वेष मत्सर व त्याला अपमानित उपरोधिक नावाने राक्षस संबोधून जाळतात. त्यामुळे आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात व येणाऱ्या पिढीमध्ये ही द्वेष मत्सराची व पेटवून देण्याची भावना कायम रुजून राहते समाजामध्ये शान्ति सुरक्षा भाईचारा समता न्याय बंधुता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकांच्या धार्मिक भावना व देवी-देवतांच्या आदर्श महामानवांना वंदन करण्याच्या सन्मान करण्याचा संविधानिक अधिकार व स्वातंत्र्य आहे तेव्हा रावण दहन प्रथा बंद करावी व समस्त मूलनिवासी आदिवासी समाजाच्या भावनेच्या विचार व्हावा. या प्रथेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून रावण दहन या विक्षिप्त कृतिला कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येऊ नये. यादरम्यान अशा विक्षिप्त कृतीचे जे कोणी समर्थन करतील किंवा न्यायप्रिय राजाचा अपमान करतील अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा.
जर दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याचा प्रयत्न केला गेला तर सर्व आदिवासी समाजाकडून तसेच इतरही समाज संघटनांकडून तीव्र स्वरूपात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा ईशारा या वेळी नेशनल आदिवासी महिला फेडरेशन च्या कार्यकर्त्यांनी केला आहे यावेळी निवेदन देताना नेशनल आदिवासी महिला फेडरेशन च्या अध्यक्ष प्रमिला सिंद्रामे, ऍडव्होकेट विवेक धुर्वे, छाया दुर्गे, संगीता पुसाम, वनिता चिचाम, निळकंठ चिचाम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
