तामसवाडी येथे नवरात्रोत्सवा निमित्त ग्रामस्थांची बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधि (राजेश  रायमळे)

आज दि.१३/१०/२०२१ रोजी संध्याकाळी ६:४५वा. तामसवाडी ता.रावेर येथे रावेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या अध्यक्षतेखाली तामसवाडी गावात दुर्गादेवी नवरात्रोत्सवाचे निमित्ताने  दुर्गा देवी मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची मिटिंग घेण्यात आली. [ads id="ads2"] 

     याबाबत सविस्तर वृत्त असे की,तामसवाडी ता.रावेर येथे पोलीस निरीक्षक कैलास जी नागरे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील ग्रामस्थांची बैठक पार पाडली सदर बैठकीत मार्गदर्शन करतांना कैलास जी नागरे  म्हणालेत की,

 शासनाच्या व मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाअन्वये कोणत्याही प्रकारच्या विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येवू नये. सदर दुर्गा उत्सव विसर्जन, धम्म चक्र प्रवर्तन दिन, ईद-ऐ-मिलादुनबी, दसरा हे शांततेत पार पाडावे असे योग्यत्या सूचना देवून     पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन केले. तसेच गावातील वाद गावपातळीवर समोपचाराने मिटविण्याबाबत मार्गदर्शन केले. [ads id="ads1"] 

             सदर मिटिंग मीटिंगला गावातील सरपंच,उपसरपंच पोलीस पाटील,गावातील प्रतिष्ठित नागरिक व  दुर्गादेवी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच गावातील  ग्रामस्थ  उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!