रिक्षाचे टायर फुटून दुचाकीला धडक लागल्याने दोघे गंभीर ;प्रकृती चिंताजनक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल प्रतिनिधीयावल कडून फैजपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाविद्यालयाजवळ रिक्षाचे पुढील चाकाचे टायर फूटून दुचाकीला धडक बसली. अपघातात तीन जण जखमी झाले.यातील दोघ जणांची प्रकृती  ही चिंताजनक आहे.[ads id="ads2"] 

  मुक्ताईनगर येथील रहिवासी नामे निवृत्ती पुंडलिक पाटील वय ४२ हे पत्नी शारदा यांच्यासह दुचाकीद्वारे श्री क्षेत्र मनुदेवी येथे दर्शनासाठी जात होते. फैजपूरकडे महेंद्र कोळी वय ३२, रा.अट्रावल हे रिक्षा घेऊन जात असलेल्या रिक्षाचे पुढील चाकाचे टायर फुटून रिक्षाचे नियंत्रण सुटून रिक्षा थेट समोरून येणाऱ्या दुचाकीवर जावून आदळली. यावेळी अपघात होऊन जखमी तिघांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.[ads id="ads1"] 

 अपघातामध्ये रिक्षाचालक महेंद्र कोळी यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तर  दुचाकी स्वार निवृत्ती पाटील यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर होऊन त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. तसेच शारदा पाटील यांना किरकोळ दुखापत झाली.


 जखमींवर डॉक्टर शुभम तिडके, अधिपरिचारिका नेपाली भोळे, आशा आदीवाल, भूषण गाजरे यांनी प्रथमोपचार करून निवृत्ती पाटील यांना तातडीने फैजपूर येथील खासगी रुग्णालयात तर महेंद्र कोळी यास जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!