नागपूर : गोरेवाडा येथील 2 वाघ (मादी) व 2 अस्वल (1 मादी व 1 नर) यांना नवी दिल्ली येथील नॅशनल झूलॉजीकल पार्कमध्ये स्थलांतरित करण्यात आले. या वन्यप्राण्यांच्या बदल्यात बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आज 10 काळवीट, 10 पांढरे काळवीट, 4 सांबर व 20 भेकर देण्यात आले आहेत.
[ads id="ads1"]
सर्व प्राण्यांना उद्यानातील तृणभक्षी वन्यप्राण्यांच्या विलगीकरण सुविधेत ठेवण्यात आले आहे. विलगीकरण कालावधी समाप्त झाल्यानंतर त्यांना 40 हेक्टर क्षेत्रातील तृणभक्षी वन्यप्राण्यांच्या सफारी क्षेत्रात सोडण्यात येईल, असे गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक पी. बी. पंचभाई यांनी कळविले आहे.
