जळगाव जिल्ह्यात आता शेतकऱ्यांचा माल हमी भावात खरेदी करून निर्यात होणार ; जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केला करारनामा मंजूर.

अनामित
यावल तालुक्यातील चुंचाळे शेतकरी उत्पादन कंपनीचा स्मार्ट प्रकल्प.
[ads id="ads2"]
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) यावल तालुक्यातील चुंचाळे येथील शेतकरी उत्पादन कंपनीने दुबई येथील जमाल अल शरीफ ट्रेडिंग एलएलसी युएई कंपनीशी केलेला करारनामा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी मंजूर करून तो करारनामा जळगाव येथे दि.22ऑक्टोंबर 2021शुक्रवार रोजी डीएसपी चौकात एका कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिला.
[ads id="ads1"]
आता चुंचाळे येथील शेतकरी उत्पादक कंपनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्व शेती उत्पादन माल,धान्य, भाजीपाला,इत्यादी सर्व वस्तू हमी भावात खरेदी करून बाहेरील देशात निर्यात करणार असल्याने शेतकऱ्यांना आता आपल्या शेती उत्पादन मालास चांगला भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल.
          चुंचाळे तालुका यावल येथील चुंचाळे शेतकरी उत्पादक कंपनीने एक स्मार्ट प्रकल्प तयार केला आणि त्या प्रकल्पाचा करारनामा दुबई येथील जमाल एल शरीफ ट्रेडिंग एलएलसी युएई कंपनीशी केला या दाखल करारनाम्यास जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी मान्यता दिली असून तो मंजूर करारनामा जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत,जळगाव महानगरपालिका महापौर सौ.जयश्री महाजन,कृषी उपसंचालक अनिल भोकरे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार दि.22ऑक्टोंबर2021रोजी जळगाव येथील डीएसपी चौकात चुंचाळे येथील शेतकरी उत्पादन कंपनीचे अध्यक्ष रोहन नेवे,गिरीश बाळकृष्ण नेवे यांना देण्यात आला.करारनाम्यास मंजुरी मिळाल्याने शेतकरी उत्पादन कंपनी अध्यक्ष संचालक सदस्य यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!