जळगाव जिल्हा बँक निवडणुक रिंगणात घरकुल घोटाळ्यातील आरोपी राहणार का? संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून.

अनामित
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव बँकेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू आहे.आज दि.20 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव येथील घरकुल घोटाळ्यातील काही आरोपी तथा जळगाव जिल्हा बँकेचे सभासद जळगाव जिल्हा बँक निवडणूक रिंगणात दिसणार आहेत 
[ads id="ads1"] का तसेच जिल्ह्यातील काही न्यायप्रविष्ट विविध कार्यकारी सोसायटीचे काही सभासद सुद्धा सहभागी होणार आहेत का याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे आणि अशा 
[ads id="ads2"] काही अपात्र नामनिर्देशित पत्रांवर कोणी हरकती न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून अपात्र अशा नामनिर्देशन पत्रावर हरकत घेणार असे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा(आदरणीय अण्णा हजारे कृत)संघटक सुरेश पाटील यांनी सांगितले.
            याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव येथील घरकुल घोटाळ्यातील एका आरोपीस निवडणूक लढविता येणार नाही असे न्यायालयाचे आदेश आहेत.तर याच घरकुल घोटाळ्यातील दुसरा एक आरोपी तथा जबाबदार लोकप्रतिनिधी निवडणूक रिंगणात कसा राहणार?तसेच यावल तालुक्यातील एका विविध कार्यकारी सोसायटीत लाखो रुपयाचा गैरप्रकार,भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना किंवा जबाबदारी निश्चित झालेली असताना त्या ठिकाणच्या एका सभासदाचा ठराव आणि त्याला मतदानाचा हक्क कोणत्या नियमाच्या आधारे देण्यात आला?याबाबत यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.अशा अपात्र सभासदांच्या विरोधात हरकतीच्या छाननीच्या दिवशी इतर पात्र नामनिर्देशित उमेदवारांनी हरकत घ्यायला पाहिजे आणि राजकीय हस्तक्षेप आणि प्रभावामुळे किंवा राजकीय सामाजिक समन्वयातून कोणी हरकत न घेतल्यास अशा काही दोषी सभासद उमेदवारांबाबत मुंबई हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठ जनहित याचिका दाखल करून सहकार विभागातील स्वाहाकार कसा सुरू आहे हे जनतेसमोर आणणार असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास.जळगाव जिल्हा. संघटक सुरेश पाटील यांनी दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!