तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधि (राजेश रायमळे)
तामसवाडी ता.रावेर येथील दोघं मंडळांचे दुर्गोत्सव विसर्जन अगदी साधेपणात आणि शांततेत पार पडले.[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तामसवाडी ता.रावेर येथे जयदुर्गा लेझीम मंडळ आणि जय हनुमान लेझीम मंडळ असे दोन मंडळं कार्यरत असून दोघं मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी आणि सदस्यांनीही समजूतदार पणाने दुर्गोत्सव विसर्जन कोविड १९ च्या अनुषंगाने शासनामार्फत प्राप्त परिपत्रकानुसारच अगदी साधेपणात कोणत्याही प्रकरे वाजंत्री अथवा मिरवणूक न काढता जागेवरच विसर्जन करून दुर्गोत्सव शांततेत पार पाडला. [ads id="ads1"]
दोघं मंडळांच्या सदस्यांनी समजूतदार पणा दाखवून आपल्या तामसवाडी गावाचे नाव उज्ज्वल करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आल्यामुळे गांवभरातील जेष्ठ आणि श्रेष्ठ प्रतिष्ठित मंडळींकडून दोघं मंडळांच्या पदाधिकार्यांचे कौतुक आणि प्रशंसा होत आहे.
जय दुर्गा लेझीम मंडळाचे दुर्गोत्सव विसर्जन शनिवार दि.१६/१०/२०२१ रोजी तर जय हनुमान लेझीम मंडळाचे दुर्गोत्सव विसर्जन रविवार दि. १७/१०/२०२१ रोजी पार पडले.